मकर 2025 राशि भविष्य

Author: Vijay Pathak | Last Updated: Wed 18 Sep 2024 3:08:35 PM

अ‍ॅस्ट्रोकॅम्प च्या या विशेष मकर 2025 राशि भविष्य आर्टिकल च्या माध्यमाने वर्ष 2025 मध्ये मकर राशीतील जातकांना कश्या प्रकारच्या चढ उतारांचा सामना करावा लागेल, त्याने जोडलेली सटीक भविष्यवाणी या आर्टिकल मध्ये वाचायला मिळेल. हे भविष्यफल 2025 मकर राशीतील जातकांसाठी पूर्ण रूपात वैदिक ज्योतिषावर आधारित आहे आणि याला आपण विकावं आणि अनुभवी ज्योतिषांच्या द्वारे ग्रह नक्षत्राची चाल आणि ग्रहांचे गोचर, इत्यादींचा लक्षात ठेऊन तयार केले गेले आहे. चला जाणून घेऊया की, वर्ष 2025 मध्ये मकर राशीतील जातकांच्या जीवनात कश्या प्रकारचे परिणाम प्राप्त होतील आणि कुठे त्यांना लक्ष देण्याची आवश्यकता असेल.


हे वर्ष तुमच्यासाठी काय खास घेऊन येत आहे, जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात तुम्हाला विशेष यश मिळू शकते आणि पुढे तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आता चला विस्ताराने जाणून घेऊया की, मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष मकर राशीतील जातकांसाठी काय खास बदल घेऊन येत आहे. 

To Read in English Click Here: Capricorn 2025 Horoscope

आर्थिक जीवन 

जर तुमच्या आर्थिक भविष्यवाणीची गोष्ट केली तर, मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार वर्षाची सुरवात तुमच्यासाठी काहीशी कमजोर राहणार आहे. एकीकडे शनी महाराज, शुक्र महाराज सोबत दुसऱ्या भावात बसून आर्थिक स्थितीला मजबूत बनवेल आणि धन संचय करण्यात मदत करेल तर, दुसरेकडे द्वादश भावात बसलेले सूर्य महाराज खर्च वाढवतील. एकादश भावात बुध महाराज असतील आणि पंचम भावात बसलेले बृहस्पती महाराजांची दृष्टी ही तुमच्या एकादश भावावर असेल ज्यामुळे धन प्राप्ती अधिक होईल आणि खर्च नियंत्रणात राहतील. ह्या सर्व स्थिती तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत आणि समृद्ध बनवण्याची संधी प्रदान करेल परंतु, मे च्या महिन्यात देवगुरु बृहस्पती सहाव्या भावात येऊन तुमच्या द्वादश भावाला पाहतील ज्यामुळे खर्चात वाढ होईल. या अप्रत्यक्षित वृद्धीला थांबवणे तुमच्यासाठी सहज शक्य नसेल. यासाठी तुम्हाला कठीण प्रयत्न करावे लागतील. मार्च च्या शेवटी शनी महाराज तुमच्या तिसऱ्या भावात येतील जे हळू-हळू प्रयत्नांनी तुम्हाला आर्थिक लाभ देईल परंतु, मे महिन्यात राहू महाराज तुमच्या दुसऱ्या भावात येऊन धन संचय करण्यात समस्या आणू शकतात म्हणून, या वर्षी सावधानतेने चालावे लागेल आणि आपले धन सांभाळावे लागेल. त्याची काही गुंतवणूक करणे ही लाभदायक राहील. 

विस्तारपूर्वक पढ़ने के लिए क्लिक करें: मकर 2025 राशिफल

स्वास्थ्य 

मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष स्वास्थ्य दृष्टिकोनाने ठीक-ठाक राहण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. वर्षाच्या सुरवाती मध्ये राशी स्वामी शनी महाराज दुसऱ्या भावात राहून स्वास्थ्य ला मजबूत बनवेल. बृहस्पती महाराज पंचम भावातून तुमच्या राशीवर दृष्टी टाकतील आणि तुमच्या स्वास्थ्याला उत्तम बनवण्यात मदत करेल परंतु, नीच राशीचा मंगळ वर्षाच्या सुरवाती मध्ये सप्तम भावातून तुमच्या राशीवर दृष्टी टाकून तुम्हाला आरोग्याच्या संबंधित समस्या देऊ शकते. एप्रिल पर्यंतची वेळ स्वास्थ्यासाठी कमजोर राहू शकते, त्या नंतर हळू हळू आरोग्यात सुधार होण्याचे योग बनतील. शनी महाराज मार्च च्या शेवटी तुमच्या तिसऱ्या भावात येतील, जिथून तुम्हाला आलास सोडावे लागेल,अथवा हळू हळू आजारांचा सामना करावा लागू शकतो. जितकी मेहनत कराल, तितका तुम्हाला स्वास्थ्य लाभ होईल, जितके फिराल तितकीच अवस्थ्या समस्या दूर राहील. राहू महाराज मे च्या महिन्यात दुसऱ्या भावात येऊन खाणे-पिणे आणि तोंडाच्या संबंधित समस्या देऊ शकतात. त्यांच्या पासून सावधान रहा म्हणजे तुम्ही एक चांगले जीवन जगू शकाल.

काय तुमच्या कुंडली मध्ये आहे शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा बृहत् कुंडली

करिअर

मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार, जर तुमच्या करिअर ची गोष्ट केली तर, नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील. नीच राशीच्या मंगळ महाराजांची दृष्टी दशम भावावर असेल परंतु दशम भावाचा स्वामी शुक्र महाराज शनी महाराजांसोबत दुसऱ्या भावात असून नोकरी मदजे उत्तम स्थितीला जन्म देईल. तुम्हाला धन लाभ ही होईल. एकादश भावात बुध महाराज आणि बृहस्पती महाराजांची एकादश भावावर दृष्टो तसेच नवम भावावर बृहस्पती महाराजांची दृष्टी तुम्हाला नोकरी मध्ये यश प्रदान करेल. तुमची मनासारखी ट्रान्सफर ही होऊ शकते आणि नोकरी मध्ये पद उन्नती मिळण्याचे ही योग बनतील. वर्षाचा उत्तरार्ध ही ठीक ठाक राहण्याची शक्यता आहे. जिथपर्यंत व्यापार करणाऱ्या जातकांचा प्रश्न आहे ता वर्षाची सुरवात तुमच्यासाठी कमजोर राहणार आहे. तुम्हाला आपल्या व्यावसायिक भागीदारीने चांगले संबंध कायम ठेवण्यावर जोर द्यावा लागेल कारण, तुमच्या मध्ये वाद होऊ शकतात. वर्षाचा उत्तरार्ध व्यावसायिक साधनांसाठी ठीक ठाक राहील परंतु, तुम्हाला तुमच्या प्रयत्नात निरंतर गती वाढवावी लागेल तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करू शकाल.

शिक्षण

जर मकर राशीच्या विद्यार्थी वर्गाची गोष्ट केली तर, मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार, वर्षाची सुरवात तुमच्यासाठी अनुकूल राहील. पंचम भावात देवगुरु बृहस्पती असतील आणि पंचम भावाचे स्वामी शुक्र महाराज दुसऱ्या भावात असतील ज्यामुळे तुम्ही आपल्या शिक्षणात मन लावून मेहनत कराल आणि त्यामुळे तुम्हाला साकारात्मक परिणाम ही पहायला मिळतील. तुम्हाला शिक्षणात चांगले परिणाम तुमचा उत्साह वाढवतील ज्यामुळे तुम्ही अधिक जास्त मेहनत करण्यात तत्पर असाल. मे च्या महिन्यात बृहस्पती महाराज सहाव्या भावात येतील. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल. तेव्हा तुम्हाला यश प्राप्त करण्याची शक्यता बनू शकते. उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, मे नंतर स्थितींमध्ये सुधार, येईल तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या उत्तरार्धात यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या मनासारख्या विषयांना कुठल्या विदेशी विद्यालयात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

पारिवारिक जीवन 

मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार, वर्ष 2025 तुमच्या पारिवारिक जीवनासाठी ठीक ठाक राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरवाती मध्ये दुसऱ्या भावात बसून शनी महाराज चतुर्थ भावावर दृष्टी टाकतील तसेच, मंगळ महाराजांची दृष्टी सप्तम भावातून दशम भावावर असेल. यामुळे कौटुंबिक जीवनात चढ-उतार असून ही परिसर सामंजस्य कायम राहील. माता पिता चा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तिसऱ्या भावात राहू नागराज भाऊ बहिणींना काही समस्या देऊ शकते परंतु, त्यांच्या सोबत तुमची बॉण्डिंग चांगली राहील. त्या नंतर मार्च च्या महिन्यात शनी महाराज तिसऱ्या भावात येऊन भाऊ बहिणींसोबत तुमचे संबंध मजबूत करवतील. राहू महाराज मे च्या महिन्यात दुसऱ्या भावात जातील ज्यामुळे कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला जपून बोलले पाहिजे अथवा काही गोष्टींवरून वाद होऊ शकतो यामुळे वाद होऊ शकतात. बृहस्पती महाराजांच्या सहाव्या भावात येण्याने आणि तिथून दशम भावावर तसेच दुसऱ्या भावावर पूर्णदृष्टी टाकण्याच्या कारणाने पारिवारिक जीवनाचे काही विवाद सोडवण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबातील कुठल्या वृद्ध व्यक्तीचे सहयोग तुम्हाला मिळेल.

वैवाहिक जीवन 

मकर 2025 राशि भविष्य च्या अनुसार जर विवाहित जातकांविषयी बोलायचे झाले तर, वर्षाची सुरवात तुमच्यासाठी कमजोर राहील. सप्तम भावात शनीच्या सुरवाती मध्ये मंगळ महाराज तुमच्या नीच राशी कर्क मध्ये विराजमान असतील आणि द्वादश भावात सूर्य महाराज स्थित असतील ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये अहम वाढू शकतो. तुमच्या दोघांच्या मध्ये क्रोधाची अधिकता नात्याला अजून बिघडवू शकते. अश्या स्थितीमध्ये कुटुंबातील लोकांचा हस्तक्षेप करणे आवश्यक होईल आणि तेव्हाच तुमचे नाते वाचेल. हळू-हळू तुमच्या मधील समस्या कमी होतील. जेव्हा मंगळ महाराज जुलै च्या महिन्यात तुमच्या नवम भावात प्रवेश करतील तेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनाने जोडलेल्या समस्या कमी होतील आणि तेव्हा तुम्ही समजू शकाल की, तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही सर्व चालू होते ते ग्रहांच्या चालीचे परिणाम होते. अश्या स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या जीवनसाथीला खूप वेळ, स्नेह आणि प्रेम दिले पाहिजे. त्यांच्या गोष्टीला ऐकणे आणि समजले पाहिजे तसेच, परस्पर सामंजस्य उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच तुम्ही एक उत्तम वैवाहिक जीवनाचे सुख प्राप्त करू शकाल.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट

प्रेम जीवन 

मकर 2025 राशि भविष्य तुमच्या प्रेम जीवनासाठी ही भविष्यवाणी करते की, वर्षाची सुरवात तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप चांगली राहणार आहे. वर्षाच्या सुरवाती मध्ये पंचम भावात बृहस्पती महाराजांचे विराजमान होणे आणि पंचम भावाचा स्वामी शुक्र महाराजांच्या दुसऱ्या भावात असणे तुमच्या प्रेम जीवनाला पुष्पित आणि पल्लवित करेल. तुम्हाला दोघांना एकमेकांच्या प्रति आकर्षण वाटेल. एकमेकांच्या गोष्टींना समजून घ्याल. एकमेकांचा सन्मान वाढवाल आणि कुटुंबातील लोकांसोबत ही भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील लोकांना भेटल्यानंतर तुमच्या नात्यात ही सन्मान वाढेल आणि एकमेकांच्या प्रति समर्पण भावना वाढेल. तुम्हाला वाटले तर तुम्ही वर्षाच्या मध्य मध्ये एकमेकांसोबत विवाह करण्याचा विचार बनवू शकतात. या वर्षी अधिक मोठे आव्हाने तुमच्या नात्यात दिसणार नाही परंतु, मार्च च्या शेवटी जेव्हा शनी महाराज तिसऱ्या भावात येऊन पंचम भावाला पाहतील तेव्हा वेळोवेळी तुमच्या प्रेमाची परीक्षा होईल अश्यात, जर तुम्ही आपल्या नात्यात खरे आहे तर, तुमचे प्रेम वाढेल आणि तुम्हाला प्रेम जीवनात यश मिळेल. 

उपाय

  • शुक्रवारी सफेद रंगाच्या गोमातेला चण्याची दाळ खाऊ घाला.
  • लहान कन्यांचा आशीर्वाद घ्या आणू त्यांना सफेद रंगाची कुठली ही भेटवस्तू द्या. 
  • शनी देवाच्या बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी सर्वाधिक उपयुक्त राहील.
  • विशेष समस्या असल्यास रुद्राभिषेक करा. यामुळे प्रत्येक समस्येचा अंत होईल. 

सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर 

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. अशा आणखी लेखांसाठी अ‍ॅस्ट्रोकॅम्प सोबत संपर्कात रहा. धन्यवाद !

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. वर्ष 2025 मध्ये मकर राशीतील लोकांची चांगली वेळ केव्हा येईल? 

मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2025 च्या सुरवाती पासून वर्षाच्या मध्य भाग पर्यंत बराच उत्तम राहण्याचे संकेत देत आहे. 

2. मकर राशीची समस्या केव्हा दूर होईल? 

शनी गोचर पासून मकर राशीतील जातकांना शनी साडेसातीचा तिसरा म्हणजे शेवटचे चरण सुरु झालेले आहे. मकर राशीतील जातकांना शनी साडेसाती पासून मुक्ती 29 मार्च 2025 ला मिळेल. 

3. 2025 मध्ये मकर राशीचे प्रेम जीवन कसे राहील?

वर्ष 2025 प्रेमाच्या संदर्भात एक अनुकूल वर्ष सिद्ध होईल. या वर्षी तुमचा व्यापार उत्तम असेल आणि तुम्ही आपल्या साथी सोबत आनंदाचे क्षण घालवतांना दिसाल.

More from the section: Horoscope