• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Child Report 2022
  • Raj Yoga Report
  • Career Counseling
Personalized
Horoscope

कुंभ 2025 राशि भविष्य: अ‍ॅस्ट्रोकॅम्प चे 2025 वार्षिक भविष्य भविष्य वाचा!

Author: Vijay Pathak | Last Updated: Wed 18 Sep 2024 3:01:04 PM

अ‍ॅस्ट्रोकॅम्प द्वारे दाखवल्या जाणाऱ्या या कुंभ 2025 राशि भविष्य आर्टिकल मध्ये वर्ष 2025 वेळी कुंभ राशीतील जातकांच्या जीवनात येणाऱ्या बदलांच्या बाबतीत संपूर्ण सटीक भविष्यवाणी वाचायला मिळू शकते. हे भविष्यफळ 2025 पूर्णतः वैदिक ज्योतिषावर आधारित आहे आणि आमच्या विद्वान ज्योतिषांच्या द्वारे ग्रह नक्षत्राची चाल, ग्रहाचे गोचर, इत्यादींच्या आधारावर गणना करून तयार केले गेले आहे. चला जाणून घेऊया वर्ष 2025 मध्ये कुंभ राशीतील जातकांना जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात कश्या प्रकारचे परिणाम प्राप्त होऊ शकतात.

कुंभ 2025 राशि भविष्य

हे वर्ष कुंभ राशीतील जातकांच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल कश्या रूपात घेऊन येईल, निजी जीवनात कसे परिणाम मिळतील आणि पेशावर जीवनात काय स्थिती असेल, या सर्व गोष्टींच्या संबंधित माहिती प्राप्त करण्यासाठी चला आता विस्ताराने जाणून घेऊया की, कुंभ 2025 राशिभविष्य अनुसार हे वर्ष कुंभ राशीतील जातकांसाठी कसे बदल घेऊन येत आहे.

Click here to read in English: Aquarius 2025 Horoscope

आर्थिक जीवन 

कुंभ 2025 राशि भविष्य (Kumbh 2025 Rashi Bhavishya) तुमच्या आर्थिक स्थितीसाठी ही भविष्यवाणी करते की, हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या वर्षाच्या सुरवाती मध्ये चढ-उताराने भरलेले राहील. जेथे अकराव्या भावात सूर्य महाराज आर्थिक स्थितीला मजबूत करेल आणि तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल तसेच, दुसऱ्या भावात राहू आणि साहाय्य भावात बसलेले मंगळ महाराज तुमच्या आर्थिक स्थितीला कमजोर करू शकतात आणि तुमच्या खर्चात ही वाढ करून तुमचे धन संचय होण्यात समस्या उत्पन्न करू शकतात परंतु, मार्च च्या शेवटी शनी महाराज तुमच्या दुसऱ्या भावात येईल ज्यामुळे विदेशी माध्यमांनी ही धनाची प्राप्ती होईल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीने ही तुम्हाला धन प्राप्त होण्याचे योग बनतील. राहू महाराज तुमच्या राशीमध्ये मे च्या शेवटी येऊ शकतात तेव्हा देवगुरु बृहस्पती ही मे च्या मध्य मध्ये तुमच्या पंचम भावात येऊन एकादश भावाला पूर्ण दृष्टीने पाहतील. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल आणि धन प्राप्तीचे सुंदर संयोग बनतील. व्यापाराने धन लाभाचे प्रबळ योग बनत आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना कठोर प्रयत्नानंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील. जर तुम्ही शेअर बाजारात धन लावण्याचा विचार करत आहे तर, त्यासाठी खूप सावधान राहून हे काम केले पाहिजे.

विस्तारपूर्वक पढ़ने के लिए क्लिक करें: कुंभ 2025 राशिफल

स्वास्थ्य 

कुंभ 2025 राशि भविष्य च्या अनुसार, हे वर्ष स्वास्थ्य च्या दृष्टिकोनाचे मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे. राशी स्वामी शनी महाराज वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमच्याच राशीमध्ये राहतील तेव्हा स्वास्थ्याला ठीक ठेवण्यात मदत करेल परंतु, अष्टम भावात केतू आणि सहाव्या भावात मंगळ महाराज तसेच दुसऱ्या भावात राहू महाराजांची उपस्थिती स्वास्थ्य समस्यांना लागोपाठ कायम ठेवण्याचा प्रयत्न करत राहील यामुळे तुम्ही कुठल्या न कुठल्या समस्यांमध्ये कायम राहतील. वर्षाच्या मध्यात स्थितीमध्ये बदल होतील कारण, तेव्हापर्यंत शनी महाराज दुसऱ्या भावात, राहू महाराज तुमच्या राशीमध्ये आलेले असतील आणि बृहस्पती महाराज पंचम भावात गेलेले असतील. बृहस्पती महाराजांची दृष्टी तुमच्या राशीवर होईल यामुळे काही प्रमाणात स्वास्थ्य समस्यांमध्ये कमी येईल परंतु, तुम्हाला निरंतर तुमच्या सकारात्मक विचारांसोबत आपल्या स्वास्थ्याला वेळ द्यावे लागेल तेव्हाच तुम्ही तंदुरुस्त राहू शकतात. तुम्हाला काही नवीन सवयी आत्मसात कराव्या लागतील आणि खाण्या-पिण्याच्या सवयीनमध्ये सुधार आणण्याची आवश्यकता असेल.

काय तुमच्या कुंडली मध्ये आहे शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा बृहत् कुंडली

करिअर

कुंभ 2025 राशिभविष्य (Kumbh 2025 Rashi Bhavishya) च्या अनुसार, तुमच्या करिअरसाठी हे वर्ष बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वर्षाच्या सुरवातीला चांगले परिणाम मिळतील. तुम्ही आपल्या मेहनतीने आपल्या विरोधींना परास्त करतील, त्यांच्यावर विजय मिळवतील. तुम्ही आपल्या कार्य क्षेत्रात आपली चांगली पकड बनवण्यात यशस्वी व्हाल कारण, तुम्ही खूप मेहनत कराल आणि आपल्या मेहनतीने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. वर्षाच्या सुरवाती मध्ये सूर्य महाराजांच्या कृपेने तुमचे वरिष्ठ अधिकारी ही प्रसन्न राहतील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना विशेष लाभ मिळू शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरवात अनुकूल राहील. व्यवसायाच्या माध्यमाने उत्तम धन लाभ होऊ शकतो. व्यवसायात उन्नती होईल वर्षाची सुरवात काहीशी हळू नक्की राहील परंतु, वर्षाच्या मध्य नंतर व्यापारात तेजी येण्याचे योग बनतील परंतु, व्यावसायिक भागीदारीने तुम्हाला आपल्या संबंधांना सुधारावे लागेल. तेव्हा व्यावसायिक यश प्राप्त होऊ शकेल. तुमच्यासाठी जुलै ते नोव्हेंबर पर्यंतची वेळ विशेषतः महत्वपूर्ण राहील.

शिक्षण

कुंभ राशीतील विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष चढ-उताराने भरलेले राहणार आहे परंतु, वर्षाचा उत्तराध अपेक्षाकृत अनुकूल राहील. वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमची एकाग्रता कमी होईल. तुम्हाला वेळोवेळी शिक्षणात लक्ष द्यावे लागेल ज्यामुळे तुम्हाला समस्या ही होईल आणि आशेच्या अनुरूप परिणाम न मिळाल्याने मन निराश ही होऊ शकते परंतु, कुंभ 2025 राशि भविष्य च्या अनुसार, जेव्हा मे च्या मध्य मध्ये बृहस्पती महाराज तुमच्या पंचम भावात येतील आणि तेथून तुमच्या नवम भावाला ही पाहतील तेव्हा तुम्हाला शिक्षणात मनासारखे परिणाम प्राप्त होतील. तुम्ही चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल ज्यामुळे शिक्षणात चांगले परिणाम मिळतीलसोबतच, उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप अनुकूल राहील आणि त्यांना मनासारखे विषय वाचण्याची संधी मिळेल ताईच, मनासारख्या विद्यालयात दाखला ही मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या जातकांसाठी वर्षाचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील. त्या वेळी तुम्हाला यश मिळण्याचे प्रबळ योग बनतील. जर तुम्ही विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात तर त्यासाठी तुम्हाला आता प्रतीक्षा करावी लागू शकते.

पारिवारिक जीवन 

कुंभ 2025 राशि भविष्य (Kumbh 2025 Rashi Bhavishya) च्या अनुसार, वर्ष 2025 ची सुरवात तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील. चतुर्थ भावात बृहस्पतु महाराज आणि दशम भावात बुध महाराज वर्षाच्या सुरवाती मध्ये उपस्थित राहून कौटुंबिक गोष्टींना अनुकूल बनवतील. कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर सामंजस्य पहायला मिळेल. कुटुंबात मोठ्यांचा आदर होईल, लहानांसोबत प्रेम आणि स्नेहाची गोष्ट होईल आणि त्याची काळजी घेतली जाईल ज्यामुळे कुटुंबाचे वातावरण खूप चांगले राहील. दुसऱ्या भावात राहू महाराजांची उपस्थिती वर्षाच्या सुरवाती मध्ये असण्याने कधी कधी चढ-उताराची स्थिती येईल परंतु, हळू हळू तुम्ही सांभाळून घ्याल. मार्च च्या महिन्यात शनी महाराज दुसऱ्या भावात येऊन कुटुंबाच्या बाबतीत वादाचे कारण बनतील कारण, तेव्हापर्यंत राहू महाराज ही तिथेच विराजमान राहतील. त्या नंतर हळू हळू राहू महाराज मे च्या महिन्यात तुमच्या राशीमध्ये येतील आणि जवळपास या वेळी मे च्या महिन्यात ही बृहस्पती महाराज पंचम भावात येऊन तुमच्या राशीला पाहतील, तेव्हा तुम्हाला योग्य अयोग्यच निर्णय घेण्यात थोडे सहज होईल. राहू महाराज अधून मधून भटकवतील परंतु, बृहस्पती महाराज तुम्हाला सांभाळून घेतील ज्यामुळे कुटुंबातील प्रेम तुमच्या सोबत कायम राहील. भाऊ-बहिणींसोबत वर्षाच्या सुरवाती मध्ये संबंध कायम ठेवण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल.

वैवाहिक जीवन 

कुंभ 2025 राशिभविष्य च्या अनुसार, विवाहित जातकांची गोष्ट केली असता वर्षाची सुरवात तुमच्यासाठी मध्यम राहील. शनी अंडी शुक्र दोघांची दृष्टी तुमच्या सप्तम भावावर राहील ज्यामुळे एकीकडे तुमच्या नात्यात काही चढ उतार राहतील. परस्पर सामंजस्य मध्ये काही कमी येऊ शकते परंतु शुक्र महाराजांच्या कृपेने नात्यात प्रेम वाढेल. तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत अधिक जवळीकता अनुभवाल आणि त्यांच्या जवळ रहाणे पसंत कराल. एकमेकांचा उज्वल पक्ष दिसेल ज्यामुळे तुमच्या नात्यात आनंद येईल. त्या नंतर मे महिन्यात जेव्हा केतू महाराज सप्तम भावात प्रवेश करतील आणि तुमच्या राशीमध्ये राहू चा प्रवेश होईल तेव्हा स्थिती बिघडू शकते कारण, परस्पर सामंजस्य न बसण्याच्या कारणाने आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू न शकल्याच्या कारणाने नात्यात समस्या वाढू शकते अश्या स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबातील वारसीथ सदस्यांकडून सल्ला घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनसाथी च्या स्वास्थ्य सोबत त्यांचा विचार, समाज आणि चांगले वाईट गोष्टींची काळजी घेतील पाहिजे तेव्हाच तुम्ही आपल्या नात्याला सुचारु रूपात चालवू शकाल. या वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट

प्रेम जीवन 

कुंभ 2025 राशि भविष्य भविष्यवाणी करते की, वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील कारण, सूर्य महाराजांची दृष्टी तुमच्या पंचम भावावर होईल तसेच सहाव्या भावात नीच राशीगत मंगळ असण्याच्या वर्णने तुमचे प्रियतम कटू बोलतील, काही रागाच्या भारत बोलतील, जे तुम्हाला खूप चांगले वाटणार नाही आणि यामुळे तुमच्यात वाद स्थिती येऊ शकते. जर तुम्ही आपल्या प्रियतम सोबत नात्याला कायम ठेवण्याची इच्छा ठेवतात तर तुम्हाला थोडे शांतीने आणि धैर्याने काम घ्यावे लागेल कारण, महिन्याच्या उत्तरार्धात या स्थितीमध्ये कमी येईल. बृहस्पती महाराज मे च्या महिन्यात पंचम भावात येऊन तुम्ही तुमच्या प्रियतम ला चांगले विचार प्रदान कराल ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय मिळून घ्याल. एकमेकांच्या प्रति विश्वास वाटेल जे तुमच्या नात्यासाठी अधिक आवश्यक असेल आणि त्याच्याच बळावर पूर्ण वर्ष तुम्ही आपल्या प्रेम जीवनाला सांभाळू शकाल तसेच परिपक्वता ही वाटेल.

बृहस्पती महाराज मे च्या महिन्यात पंचम भावात येतील तुम्ही आपल्या प्रियतम ला चांगले विचार प्रदान करतील ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय मिळून घ्याल. एकमेकांच्या प्रति विश्वास वाटेल जे तुमच्या नात्यासाठी अधिक आवश्यक असेल आणि त्याच्या बळावर पूर्ण वर्ष तुम्ही आपल्या प्रेम जीवनाला सांभाळू शकाल तसेच त्यात परिपक्वता असेल.

उपाय

  • तुम्ही शनिवारी श्री शनी चालीसाचे पाठ केले पाहिजे.
  • या सोबतच प्रत्येक शनिवारी सरसोचे तेल किंवा तिळाचा दिवा लावून बजरंग बाण चा पाठ केला पाहिजे.
  • शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी आपल्या अनामिक बोटात उत्तम गुणवत्तेचा हिरा किंवा आपल रत्न घालणे तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  • मंगळवारी श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन गूळ आणि चण्याच्या प्रसाद वाटा. 

सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर 

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. अशा आणखी लेखांसाठी अ‍ॅस्ट्रोकॅम्प सोबत संपर्कात रहा. धन्यवाद !

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. 2025 मध्ये कुंभ राशीतील लोकांचे काय होणार आहे?

वर्ष 2025 मध्ये करिअर च्या दृष्टीने वर्ष अनुकूल राहील. तुम्ही आपल्या विरोधींचा सामना करण्यात यशस्वी व्हाल.

2. वर्ष 2025 मध्ये कुंभ राशीतील जातकांचे स्वास्थ्य कसे राहील?

वर्ष 2025 मध्ये स्वास्थ्य संदर्भात मिश्रित परिणाम मिळतील. तुम्हाला काही नवीन सवयी आत्मसात कराव्या लागतील आणि खाण्या-पिण्याच्या सवयीत सुधार आणण्याची आवश्यक्ता पडेल. 

3. कुंभ राशीचा स्वामी कोण आहे?

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे.

4. कुंभ जातकांची शनी साडेसाती केव्हा समाप्त होईल?

कुंभ राशीवाल्यांवर शनीची साडेसाती 24 जानेवारी 2022 ला सुरु झाली होती आणि 03 जून 2027 ला समाप्त होईल.

More from the section: Horoscope 4105
Buy Today
Gemstones
Get gemstones Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Yantras
Get yantras Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Navagrah Yantras
Get Navagrah Yantras Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Rudraksha
Get rudraksha Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Today's Horoscope

Get your personalised horoscope based on your sign.

Select your Sign
Free Personalized Horoscope 2024
© Copyright 2024 AstroCAMP.com All Rights Reserved