• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Child Report 2022
  • Raj Yoga Report
  • Career Counseling
Personalized
Horoscope

मीन राशि भविष्य 2021 - Meen Rashi Bhavishya 2021 in Marathi

Author: -- | Last Updated: Fri 11 Sep 2020 3:09:40 PM

मीन राशि भविष्य 2021 मीन राशि भविष्य 2021 (Meen Rashi Bhavishya 2021) च्या अनुसार मीं राशीतील लोकांसाठी हे वर्ष मिळते जुळते परिणाम घेऊन येणार आहे 2021 वर्षात तुम्हाला जिथे काही क्षेत्रात उत्तम यश मिळण्याचे योग दिसत आहेत तिथेच काही क्षेत्र असे ही आहे जिथे तुम्हाला सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. जसे करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी वर्ष बरेच उत्तम जाणारे मानले जाऊ शकते. या वर्षी तुम्ही कार्य क्षेत्रात हार्ड वर्क नाही तर, स्मार्ट वर्क करण्याचा ही सल्ला आहे. मेहनतीने काम केल्यास तुम्ही आपले उच्च शिक्षण आणि परदेशात जाऊन अभ्यास करण्याचे स्वप्न ही पूर्ण करू शकतात याच्या व्यतिरिक्त, काही जातकांच्या कुंडली मध्ये या वर्षी त्यांना मनासारखी ट्रांसफर ही मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त, जर कुणी जातक व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर, या वर्षी ते आपल्या कामाचा विस्तार करण्याचा विचार करू शकतात कारण, व्यापाराच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम जाणार आहे.

आर्थिक दृष्टीने ह्या वर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम मिळतील. जिथे एकीकडे तुम्हाला एक स्थायी कमाईचा मार्ग मिळण्याची शक्यता आहे तेच वर्षातील काही महिन्यात तुमचे खर्च वाढण्याची प्रबळ शक्यता आहे. या वाढलेल्या खर्चाने तुम्हाला मानसिक तणाव होण्याची अपेक्षा आहे परंतु, चिंतीत होण्याची आवश्यकता नाही. तुमचे खर्च वाढतील परंतु, तुम्हाला आर्थिक समस्या येणार नाहीत. मीन राशि भविष्य 2021 मध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला मिळते जुळते परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला अभ्यासात व्यत्यय ही वाटू शकतो परंतु, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल उचलण्याचा विचार करत असाल तर, ही वेळ तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त राहणारी आहे याच्या व्यतिरिक्त, जर तुम्ही काही स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याची इच्छा ठेवतात तर, एप्रिल पासून मे पर्यंतचा वेळ आणि ऑगस्ट ते सप्टेंबरच्या महिना बराच अनुकूल राहील.

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष 2021 मीन राशीतील जातकांसाठी बरेच उत्तम राहणारे आहे. जर या वर्षी तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर, यामध्ये नफा कमाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांना घर रेंट ने ही चांगली कमाई होऊ शकते. तथापि, आई वडिलांचे आरोग्य संबंधित समस्या तुम्हाला अडचणीत टाकू शकतात म्हणून, सावध राहा.

दांपत्य जीवनासाठी वर्ष 2021 बरेच उत्तम जाणार आहे. या वर्षी पती-पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येईल. प्रेम आणि आपले पणा ही वाढेल. या वर्षी विशेषतः वर्षाच्या सुरवातीचे तीन महिने आणि नंतर ऑक्टोबरच्या शेवट पासून नोव्हेंबर मध्य पर्यंत तुमचे दांपत्य जीवन बरेच मधुर बनेल तथापि, अधून मधून वाद होऊ शकतात परंतु, प्रयत्न करा की, चर्चा करून गोष्टींवर मार्ग काढा. वर्ष 2021 मध्ये मीन जातकांच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली तर, हे वर्ष तुमच्यासाठी चढ उताराने भरलेले राहील.

प्रेमात पडलेल्या काही जातकांना या वर्षी प्रेम विवाहाची संधी मिळेल. याच्या व्यतिरिक्त वर्षाच्या सुरवाती मध्ये म्हणजे जानेवारी पासून एप्रिल पर्यंतच्या महिन्यात तुमच्या कुंडली मध्ये बृहस्पतीच्या दृष्टीने विवाहाचे प्रबळ योग बनतांना दिसत आहेत.

वर्ष 2021आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीतील जातकांसाठी बरेच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुमचे आरोग्य उत्तम राहील परंतु, याचा अर्थ असा अजिबात ही नाही की, तुम्ही आपल्या आरोग्याला घेऊन एकदम बिंदास होऊन जा. या वर्षी आरोग्य सोबतच तुम्हाला आपल्या दिनचर्येची ही चांगली काळजी घ्यावी लागेल अथवा तुम्हाला चरबी किंवा जाडे होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल जे भविष्यात तुम्हाला चिंतीत करू शकतात.

मीन करियर राशि भविष्य 2021

मीन राशीतील जातकांसाठी हे वर्ष 2021 करिअरच्या दृष्टीने बरेच चांगले जाण्याची अपेक्षा आहे. तुमची वेळ बेशक चांगली आहे परंतु, इथे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या कार्य क्षेत्रात उच्च पदांवर बसलेल्या लोकांसोबत चांगले संबंध बनवून ठेवा असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार या वर्षी काही जातकांचे बॉस त्यांच्या कठीण परिश्रमाने प्रभावित होऊन त्यांची उन्नती ही करू शकतात. अश्यात तुम्ही आपल्या कामात कुठल्या ही प्रकारची कमतरता ठेऊ नका. कामात चांगली मेहनत करा आणि स्मार्ट वर्क करण्याची तुम्हाला अपेक्षा आहे.

कामाच्या बाबतीत एप्रिल पासून सप्टेंबर चा महिना तुमचे परदेशात जाण्याचे योग बनवतांना दिसत आहेत याच्या व्यतिरिक्त, काही जातकांना या वर्षीचा शेवटचा महिना आनंद घेऊन येणार आहे कारण, या काळात त्यांचे मना सारखे स्थानांतर मिळण्याची प्रबळ शक्यता बनत आहे.

याच्या व्यतिरिक्त, ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्य महिन्यात मीन जातकांना त्यांच्या कार्य क्षेत्रात जबरदस्त पद उन्नती मिळण्याचे योग बनत आहेत. व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हे वर्ष बरेच अनुकूल राहणारे आहे.

व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी वर्ष बरेच चांगले राहण्याची अपेक्षा आहे अश्यात जर कुणी जातक या वर्षी आपल्या कामाचा विस्तार करण्याचा विचार करत असेल तर, नक्कीच या दिशेमध्ये पाऊल टाका तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार आर्थिक जीवन

मीन राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टीने वर्ष 2021 मिळते जुळते परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. या वर्षी शनी देव तुमच्या कुंडलीच्या एकादश भावात विराजमान होतील यामुळे तुमच्यासाठी स्थायी कमाईचे योग बनतांना दिसत आहेत यामुळे तुमची आर्थिक स्थिती वर्षभर ठीक राहील.

याच्या व्यतिरिक्त, वर्षाच्या सुरवातीमध्ये मंगळ ही तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात विराजमान राहील यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील परंतु, एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्य चा महिना अधिक ऑकुल दिसत नाही कारण, या काळात बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या बाराव्या भावात उपस्थित राहील.

याचा परिणाम हा असेल की, एप्रिल पासून सप्टेंबर महिन्याच्या मध्ये तुमच्या खर्चात वाढ होईल यामुळे तुम्हाला मानसिक तणाव ही होऊ शकतो. बृहस्पतीच्या या भावात असण्याने वर्षातील काही महिन्यांमध्ये तुमच्या कमाईच्या हिशोबाने खर्च अधिक वाढतील.

तथापि, एप्रिल पासून मे महिन्यामध्ये काही असा वाद विवाद होऊ शकतो किंवा कोर्ट कचेरीने जोडलेली अशी काही गोष्ट वरती येऊ शकते जी तुम्हाला आर्थिक मदत करेल. या गोष्टींमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. याच्या व्यतिरिक्त वर्षात अधून मधून तुमचा जीवनसाथी काही प्रकारचा धन लाभ ही देऊ करवू शकतो.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार शिक्षण

मीन राशि भविष्य 2021 च्या अनुसार शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हे वर्ष मिळते-जुळते परिणाम घेऊन येणार आहे. या वर्षी शनीची दृष्टी तुमच्या राशीच्या पंचम भावात पडत आहे जी सामान्यतः शिक्षणाच्या क्षेत्रात अवरोध उत्पन्न करेल.

या नंतर जानेवारी पासून एप्रिल पर्यंतच्या महिन्यात बृहस्पतीची दृष्टी तुमच्या राशीच्या पंचम भावात होण्याने शिक्षण थांबून थांबून चालत राहील तथापि, वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांची चांगली वेळ येईल आणि 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबर च्या मध्य मध्ये त्यांचा शिक्षणाचे चांगले योग बनतील.

या वर्षी अभ्यासाच्या योगाचा ग्राफ खाली वर होऊ शकतो परंतु, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मन लावून मेहनत करणे थांबवू नका तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळेल.

जर तुम्ही काही स्पर्धा परीक्षेत भाग घेत असाल तर, त्यात तुमच्यासाठी एप्रिल पासून मे महिन्याची वेळ आणि ऑगस्ट पासून सप्टेंबरचा महिना बराच अनुकूल राहील. या काळात तुम्हाला परीक्षेत यश मिळण्याचे योग बनतांना दिसत आहेत.

उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उपयुक्त राहणार आहे. या वर्षी तुमच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न ही पूर्ण होऊ शकतात तथापि, परदेशात जाण्याची इच्छा ठेवणारे या वर्षी खास यश मिळणार नाही कारण, त्यांच्या विदेश यात्रेत थोडा विलंब होऊ शकतो.

या उतार चढवा नंतर एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्ये काही लोकांना शिक्षणाच्या क्षेत्रात आंशिक यश मिळण्याची शक्यता बनत आहे म्हणून, मेहनत करत राहा.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार पारिवारिक जीवन

मीन राशि भविष्य 2021 च्या अनुसार या राशीतील जातकांसाठी त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत बरेच उत्तम राहणारे आहे. तुम्ही एकाद्या प्रॉपर्टी खरेदी आणि विकण्यात नफा कमावू शकतात. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांना घराच्या रेंट ने चांगली कमाई होऊ शकते.

तुमच्या प्रति तुमच्या भाऊ बहिणींचा दृष्टिकोन बराच अनुकूल राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त, हे वर्ष त्यांच्यासाठी बरेच चांगले जाणारे आहे. तुमच्या आई वडिलांसाठी ही हे वर्ष बरेच चांगले जाण्याची आशंका आहे.

तथापि, एप्रिल आणि मे महिन्याच्या वेळात तुम्हाला आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, या वेळात त्यांच्या आरोग्य संबंधित काही समस्या समोर येऊ शकतात म्हणून, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तर एकूणच, हे वर्ष तुमच्यासाठी बरेच चांगले जाण्याची अपेक्षा आहे.

2021 मीन राशि भविष्य अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान

वर्ष 2021 मीन जातकांच्या दांपत्य जीवनासाठी उत्तम जाणारे आहे. हे वर्ष तुम्ही पती पत्नीच्या आयुष्यात मधुरता आणेल तसेच प्रेमात आपलेपणा वाढेल. या वर्षी विशेषतः वर्षाच्या सुरवाती मध्ये तीन महिने आणि नंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवट पासून नोव्हेंबर महिन्याच्या मध्य पर्यंत तुमचे दांपत्य जीवन बरेच मधुर राहील.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार निसंतान दांपत्य ही या वर्षी संतान प्राप्तीची कामना करू शकतात कारण, त्यांच्या संतान योगाने या वर्षी बरेच प्रबळ आहेत.

वर्ष 2021 प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत बरेच चांगले जाईल परंतु, 6 सप्टेंबर पासून 22 ऑक्टोबर च्या मध्य महिन्या पर्यंत आपल्या नात्यावर थोडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण, या काळात काही लहान गोष्टींचा उहापोह आणि मग मोठा वाद ही होण्याची शक्यता बनतांना दिसत आहे.

मीन जातकांच्या संतान पक्षासाठी ही वेळ बरीच उत्तम मानली जाऊ शकते. वर्ष 2021 मध्ये राहू मीन जातकांच्या कुंडलीच्या तिसऱ्या भावात असेल यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहेत.

जर मीन जातकांची संतान नोकरीच्या क्षेत्राने तालुक ठेवत असेल आणि ते अभ्यास करतात तर, त्यांना ही या क्षेत्रात उत्तम लाभ मिळण्याचे योग आहेत तथापि, तुमची एकाग्रता भंग होऊ शकते यामुळे अभ्यासात सारखी बाधा येऊ शकते. मन लावून अभ्यास करा परिणाम चांगले मिळतील.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार प्रेम जीवन

वर्ष 2021 मध्ये मीन जातकांच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली तर, वर्ष तुमच्यासाठी चढ-उताराने भरलेले राहील. या पूर्ण वर्षात शनीची दृष्टी तुमच्या राशीच्या पंचम भावात राहणार आहे यामुळे पूर्ण वर्ष तुमच्या प्रेम जीवनात चढ उतार स्थिती कायम राहण्याची आशंका आहे.

तथापि, वर्षाच्या सुरवाती मध्ये म्हणजे जानेवारी पासून एप्रिल पर्यंतच्या महिन्यात तुमच्या कुंडलीमध्ये बृहस्पतीच्या दृष्टीने विवाहाचे प्रबळ योग बनतांना दिसत आहे अश्यात काही लोकांना प्रेम विवाहाची संधी मिळू शकते.

या नंतर 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबरच्या वेळात प्रेमाच्या संबंधासाठी ही वेळ तुमच्यासाठी बरीच चांगली राहण्याची अपेक्षा आहे.

या नंतर 2 जून ते 20 जुलै च्या मध्य महिन्यात थोडी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या काळात जितके शक्य असेल वाद-विवादांपासून सावध राहा कारण, या काळात झालेले वाद भांडणाचे मोठे रूप घेऊ शकते. वर्षाच्या शेवट पर्यंत म्हणजे 5 डिसेंबर पासून एक वेळ परत तुमच्या आयुष्यात प्रेम दार ठोठावू शकतो.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार स्वास्थ्य जीवन

वर्ष 2021 आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीतील जातकांसाठी बरेच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुमचे आरोग्य उत्तम राहील परंतु, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आरोग्याची काळजी घेणारच नाही.

या वर्षी 6 एप्रिल ते 15 सप्टेंबरच्या मध्य महिन्यात बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या द्वादश भावात राहील यामुळे तुमचे आरोग्य कमजोर होण्याची स्थिती ही दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त, 20 नोव्हेंबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंत तुमचे आरोग्य कमजोर राहू शकते. या काळात जितके शक्य असेल आरोग्याच्या प्रति सजग राहा.

Meen Rashi Bhavishya 2021 च्या अनुसार या वर्षी तुम्हाला सल्ला दिला जातो की, आरोग्य सोबतच तुम्ही आपली दैनिक क्रियांची काळजी घ्या कारण, या वर्षी तुमच्या मेद वृद्धी ची प्रबळ शक्यता आहे. आपल्या आरोग्याच्या सोबत आपल्या दिनचर्येचे विशेष काळजी घ्या अन्यथा या वर्षी तुम्हाला काही मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

मीन राशि भविष्य 2021 अनुसार ज्योतिषीय उपाय

  • तुम्ही उत्तम स्वास्थ्य आणि जीवनाच्या उन्नतीसाठी उत्तम गुणवत्तेचा पुखराज रत्न सोन्याच्या मुद्रिका मध्ये तर्जनी बोटात बृहस्पतीवरच्या दिवशी 12:30 ते 1:00 च्या मध्ये धारण केले पाहिजे.
  • याच्या व्यतिरिक्त दोन मुखी तसेच तीन मुखी रुद्राक्ष धारण करणे ही तुमच्यासाठी बरेच फायद्याचे राहील ज्याला तुम्ही क्रमशः सोमवार आणि मंगलवार च्या दिवशी धारण करू शकतात.
  • तुम्ही नेहमी आपल्या खिशामध्ये पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला पाहिजे.
  • विशेष रूपात हनुमानाची उपासना करणे तुमच्यासाठी महान फलदायी सिद्ध होईल.
  • शनिवारी माती किंवा लोखंडाच्या पात्रात सरसोचे तेल भर आणि त्यात आपली प्रतिमा पाहून दान करा हे छाया दान तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचा शेवट करेल.
More from the section: Horoscope 3061
Buy Today
Gemstones
Get gemstones Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Yantras
Get yantras Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Navagrah Yantras
Get Navagrah Yantras Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Rudraksha
Get rudraksha Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Today's Horoscope

Get your personalised horoscope based on your sign.

Select your Sign
Free Personalized Horoscope 2025
© Copyright 2024 AstroCAMP.com All Rights Reserved