• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Child Report 2022
  • Raj Yoga Report
  • Career Counseling
Personalized
Horoscope

सिंह राशि भविष्य 2021 - Sinha Rashi Bhavishya in Marathi

Author: -- | Last Updated: Fri 11 Sep 2020 2:27:15 PM

सिंह राशि भविष्य 2021 सिंह राशि भविष्य 2021 (Sinha Rashi Bhavishya 2021) च्या अनुसार हे वर्ष सिंह जातकांसाठी चढ-उताराने भरलेले असेल. या वर्षी तुमच्या राशीमध्ये राहू दशम भावात असण्याने तुम्हाला याच्या सुरवातीमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात परंतु, या वर्षी तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात शनी आणि बृहस्पतीची युती होण्याने तुम्हाला शत्रूंनी घेरलेले वाटू शकते.

या सोबतच वर्षाच्या सुरवाती मध्ये मंगळ तुमच्या कुंडलीच्या नवम भावात राहील याच्या परिणामस्वरूप, भाग्य सोबतच कार्य क्षेत्रात ही तुमचे चांगले संबंध बनवण्यात यशस्वी राहाल. जे जातक व्यापार क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना खास सावधानी ठेवावी लागेल कारण, त्यांची हानी होण्याचे योग बनताना दिसत आहे.

सिंह राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हे वर्ष ठीक-ठाक जाणारे आहे. या वर्षी तुम्ही आपल्या कमाई आणि आपल्या कुटुंबातील सहयोगाने धन अर्जित करण्यात यश मिळवाल.

जर या वर्षी तुम्ही काही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे तर, तुम्हाला खूप विचार करून पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे कारण, ही वेळ तुमच्यासाठी कदाचित अनुकूल सिद्ध होऊ शकत नाही. अभ्यासात कुठला ही शॉर्ट कट वापरू नका अथवा नुकसान होऊ शकते अश्यात फक्त आणि फक्त मेहनत करा तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. या वर्षी सिंह राशीतील कुंडलीमध्ये बृहस्पती देव सहाव्या भावातून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. अश्या स्थितीमध्ये बऱ्याच लोकांना मिळते जुळते परिणाम मिळू शकतात.

सिंह जातकांना आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण, या वर्षी त्यांचे आरोग्य चढ-उताराने भरलेले राहण्याची शंका आहे. जे ही व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहात आहे त्यांना फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्या मध्ये स्वप्न खरे होतांना दिसतील. वैवाहिक जीवन आणि संतान च्या हिशोबाने पहिले तर सिंह जातकांसाठी वर्ष 2021 ची सुरवात तणावपूर्ण राहील.

या वर्षी काही प्रेमात पडलेल्या जातकांना प्रेम विवाह करण्याची संधी आणि सौभाग्य मिळतांना दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह जातकांना वर्ष 2021 खूप आव्हानात्मक असण्याची प्रबळ शक्यता आहे. सिंह जातकांना या वर्षी आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल कारण त्यांना हात, पोट संबंधित आजार त्रास देऊ शकतात. चला आता विस्ताराने जाणून घेऊया कसा राहील सिंह जातकांसाठी 2021.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार करियर

सिंह करियर राशि भविष्य 2021 अनुसार या पूर्ण वर्षात राहूच्या तुमच्या दशम भावात उपस्थित राहिल्याने तुमच्यावर बराच चांगला प्रभाव पडेल. राहूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्ही दुसऱ्यांवर हावी राहून आपली प्रत्येक गोष्ट मनवून घेण्यात यशस्वी राहतील. तुम्ही लहान लहान युक्तींनी आपले काम काढण्यात यशस्वी व्हाल. या वर्षी तुमची अचानक उन्नती होण्याचे योग बनत आहे परंतु, असे होण्याच्या स्थितीमध्ये काही लोकांना या गोष्टीचे वाईट वाटू शकते आणि यामुळे तुमच्या शत्रूंच्या संख्येत वाढ ही होण्याची शक्यता आहे.

या वर्षी तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात शनी आणि बृहस्पतीची युती होण्यामुळे तुम्ही शत्रूंनी घेरलेले असाल तथापि, स्थिती वर्ष भर अशी राहणार नाही. अधून मधून तुम्ही त्यांच्या सोबत जिंकण्यात यशस्वी व्हाल. शत्रूं सोबत चाललेल्या गोष्टींमुळे वर्ष भर तुम्हाला मानसिक तणाव राहील.

वर्ष 2021 च्या सुरवातीमध्ये मंगळ तुमच्या कुंडलीच्या नवम भावात राहील यामुळे परिणामस्वरूप, भाग्य सोबतच कार्य क्षेत्रात ही तुम्ही चांगले संबंध बनवण्यात यशस्वी व्हाल तथापि, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी काळ थोडा आव्हानात्मक राहील कारण, या काळात मंगळ तुमच्या कुंडलीच्या एकादश भावात असेल. ज्याचा परिणाम हा असू शकतो की, या काळात तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध बिघडू शकतात. शक्य असल्यास या पासून सावध राहा.

एप्रिल जून आणि सप्टेंबर मध्ये कामाच्या बाबतीत तुमच्या यात्रेचे प्रबळ योग बनतांना दिसत आहे जे प्रत्येक दृष्टीने तुमच्या यशात बाधा आणण्याचे काम करतील. जे जातक व्यापार क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना येथे खास सावधान राहावे लागेल कारण, त्यांची हानी होण्याचे योग ही बनताना दिसत आहे.

जे जातक या वर्षी गुंतवणुकीच्या बाबतीत विचार करत आहे त्यांना ही बरेच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. विचार करूनच गुंतवणूक करा अथवा चालू काम बिघडू शकते.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार आर्थिक जीवन

सिंह आर्थिक राशि भविष्य 2021 (Sinha Finance Rashi Bhavishya 2021) च्या अनुसार सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष आर्थिक गोष्टींसाठी चढ-उताराचे राहील. सिंह राशीच्या जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हे वर्ष ठीक-ठाक असेल परंतु या वर्षी आपला खर्च अधिक होईल, ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होईल. या वर्षी आपल्याला आपला रोजगार वाढवण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

या गोष्टींसाठी आपल्या वर्ष्याची सुरुवात ठीक-ठाक राहील. एप्रिल महिना अजून चांगला जाईल. या महिन्यात आपला रोजगार देखील वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील मिळेल. व्यवस्थित रित्या केले तर आपण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये धन संचय करण्यात यशस्वी व्हाल. या वर्षी आपण आपले उत्पन्न आणि आपल्या कुटुंबाच्या सहयोगामुळे धन प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल.

एप्रिलपासून तर सप्टेंबर महिन्याच्या मध्यपर्यंत दांपत्य जीवन किंवा लग्न-विवाह संबंधित आपले खर्च वाढू शकतात. जे जातक व्यापार करतात त्यांनी या वर्षी विशेष लक्ष ठेवले पाहिजे अन्यथा नुकसान होऊ शकते.

जर यावर्षी आपण एखाद्या मोठ्या धनचे निवेश करण्याचा विचार करत असाल तर यावेळी आपल्याला खूप विचारपूर्वक पाऊल उचलण्याची गरज आहे कारण, ही वेळ तुमच्यासाठी कदाचित अनुकूल नसेल. या वर्षी जर तुम्ही काही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करात आहे तर, कमीत कमी धन गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करा आणि जितके शक्य असेल एकटाच व्यवसाय करा. हेच तुमच्यासाठी लाभदायक असेल.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार शिक्षण

सिंह जातकांचे वर्ष 2021 मध्ये शिक्षण क्षेत्रात मिळते-जुळते परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कुठल्या ही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे स्पर्धा परीक्षेसाठी एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत वेळ कठीण सिद्ध होऊ शकते. या वेळात अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

विद्यार्थ्यांसाठी जानेवारी ते एप्रिल पर्यंतची वेळ बरीच अनुकूल राहणार आहे. या नंतर मे पासून ऑगस्ट पर्यंतची वेळ थोडी आव्हानात्मक राहील आणि 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत परत एकदा सिंह राशीतील विद्यार्थ्यांचा अनुकूल वेळ सुरु होईल.

उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी बरीच मेहनत करावी लागेल. जर तुम्ही परदेशात जाण्याची इच्छा ठेवत असाल तर, वर्ष थोडे चिंता देऊ शकते. धैर्याने काम घ्या.

परदेशात जाणाऱ्या जातकांच्या रस्त्यात थोडे व्यत्यय येऊ शकतात. या वर्षी जर तुम्ही आपल्या मनासारख्या कॉलेज मध्ये प्रवेश करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यात ही कमी शक्यता दिसत आहे. अभ्यासात कुठल्या ही प्रकारचा शॉर्ट कट वापरू नका. मेहनत करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार पारिवारिक जीवन

वर्ष 2021 मध्ये सिंह जातकांसाठी कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता तो केतूच्या चौथ्या भावात उपस्थित होण्यामुळे स्थिती अनुकूल न होण्याकडे इशारा करत आहे तथापि, सिंह जातकांच्या कुंडलीमध्ये बृहस्पती सहाव्या भावातून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. यामुळे ही स्थिती जातकांना मिश्रित देऊ शकते.

कुंडलीमध्ये होणाऱ्या या फेरबदलाचा परिणाम काही होईल कि कधी सिंह जातकांच्या कुटुंबामध्ये सामंजस्य असेल तर कधी कुटुंबामध्ये समस्यांचा सामना देखील करावा लागेल. सिंह जातकांना आपल्या आई-वडीलांच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल कारण या वर्षी आपल्या आई-वडिलांचे आरोग्य चढ-उताराचे असल्याची शक्यता आहे.

आपल्याला आपल्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे कारण ते आपल्या जीवनामध्ये एखाद्या प्रकारची समस्या उभी करू शकता. सिंह जातकांसाठी वर्ष 2021 मध्ये सर्वात मोठ्या सुखाचे कारण त्यांचे छोटे भाऊ-बहीण असू शकतात.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार जर कोणी सिंह जातक आपल्या घराचे स्वप्न बघत असेल तर फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्यामध्ये तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हा वेळ घर आणि संपत्ती खरेदी करण्याचा योग बनवत आहे. यांच्यानंतर 5 डिसेंबर नंतर पुन्हा हा योग बनेल परंतु यावेळी आपल्याला आपल्या आईच्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यावे लागेल कारण यावेळी आपल्या आईचे आरोग्य थोडे नाजूक होऊ शकते.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार वैवाहिक जीवन आणि संतानच्या हिशोबाने पाहिले असता सिंह जातकांचे हे वर्ष सुरवातीच्या दिवसात तणावपूर्ण राहणार आहे. सिंह जातकांच्या जीवनात उत्पन्न या समस्या फक्त बृहस्पतीच्या कृपेने दूर होऊ शकते.

हा तणाव एप्रिल - सप्टेंबर पर्यंत वाढू शकतो. एप्रिल पासून सप्टेंबरच्या महिन्यात तुम्हाला तुमच्या दांपत्य जीवनात जास्त वेळ द्यावा लागेल कारण, या वेळी तुमच्या नात्यामध्ये अलगाव स्थिती येऊ शकते आणि त्यांच्या नाते तुटण्याची शक्यता येऊ शकते. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

जर कोर्ट कचेरीने जोडलेले काही काम असेल तर, उत्तम हेच असेल की, काही वेळ थांबून जा. योग्य वेळ आपल्यानंतरच या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे योग्य राहील. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जीवनसाथीचे आरोग्य कमजोर राहू शकते ज्यामध्ये तुमचा चांगलाच पैसा खर्च ही होऊ शकतो.

याच्या व्यतिरिक्त जर संतानची गोष्ट केली असता त्यांच्या बाबतीत 2021 ची वेळ बरीच उत्तम जाणारी आहे. सिंह जातकांच्या संतानला या वर्षी त्यांच्या प्रत्येक कामात यश नक्कीच मिळेल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाहतांना तुम्हाला आराम ही मिळेल म्हणजे संतानच्या बाबतीत तुमचे हे वर्ष बरेच चांगले राहण्याची शक्यता आहे.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार प्रेम जीवन

सिंह प्रेम राशि भविष्य 2021 च्या अनुसार हे वर्ष सिंह जातकांसाठी त्यांच्या प्रेम जीवनामध्ये मिळते-जुळते फळ घेऊन येणार आहे. या वर्षी प्रेमात पडलेल्या काही जातकांचे विवाह देखील होण्याचे योग दिसून येत आहे. प्रेम विवाहाचा संयोग एप्रिल ते सप्टेंबर महिन्यांच्या मध्यला येऊ शकतो.

या व्यतिरिक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये अविवाहित लोकांचे विवाह होण्याची प्रबळ शक्यता दिसून येत आहे. या वर्षी प्रेम संबंधावर आपल्याला विशेष नजर ठेवावी लागेल कारण हे वर्ष आपल्या नात्यासाठी चढ-उताराचे राहणार आहे. काही समस्या आणि काही चढ-उतारासोबत एकंदरीत आपले प्रेम जीवन चांगले राहणार आहे.

प्रेम संबंधात मधुरता टिकून राहण्यासाठी आणि समस्या कमीत कमी येण्यासाठी हे गरजेचे आहे कि आपण एकमेकांना समजून घ्या आणि आपल्या गोष्टी व्यवस्थित मांडण्यासाठी पूर्ण वेळ घ्या.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार स्वास्थ्य जीवन

सिंह स्वास्थ्य राशि भविष्य 2021 (Sinha Health Rashi Bhavishya 2021) अनुसार या वर्षामध्ये सिंह जातकांना स्वास्थ संबंधित समस्या येऊ शकतात, अशाने गरजेची आहे की आपण आधीपासूनच आपल्या स्वास्थ घेऊन सजग रहा. या व्यतिरिक्त कुंडलीमध्ये बनणारी शनि आणि गुरुची युती सहाव्या भावामध्ये एखाद्या मोठ्या रोगाला जन्म देण्याचे संकेत देत आहे. म्हणजे स्वास्थला घेऊन सिंह जातकांसाठी वर्ष 2021 खूप आव्हान पूर्ण असण्याची प्रबळ शक्यता आहे.

सिंह जातकांना या वर्षी आपल्या आरोग्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर त्यांना हाथ, पोट आणि किडनी संबंधित आजार त्रास देऊ शकतात. या वेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या व्यतिरिक्त अर्धांग वायु आणि गुडघ्या संबंधित समस्यापासून देखील आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. या वर्षी मधुमेहाशी पीडित जातकांना आपली विशेष काळजी घेण्याची गरज आहे, नाहीतर समस्या वाढू शकता.

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार ज्योतिषीय उपाय

  • उत्तम गुणवत्तेचा माणिक्य रत्न तांब्याच्या मुद्रेत रविवारी धारण करणे उत्तम राहील.
  • रविवारी बैलाला गहू किंवा पीठ खाऊ घाला.
  • वडिलांची सेवा करा आणि त्यांचा सन्मान करा.
  • शनिवारी सरसोच्या तेलात प्रतिमा पाहून दान करणे उत्तम असेल.
  • गुरुवारी उपवास करणे किंवा पिंपळाच्या झाडाला हात न लावता पाणी टाकणे उत्तम असेल.
More from the section: Horoscope 3054
Buy Today
Gemstones
Get gemstones Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Yantras
Get yantras Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Navagrah Yantras
Get Navagrah Yantras Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Rudraksha
Get rudraksha Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Today's Horoscope

Get your personalised horoscope based on your sign.

Select your Sign
Free Personalized Horoscope 2025
© Copyright 2024 AstroCAMP.com All Rights Reserved